अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली असून या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे विरारवरुन चर्चगेट आणि चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. भर पावसात पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा ठप्प झाल्याने कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी खालून लोकल ट्रेन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेत ओव्हरहेड वायरचेही नुकसान झाले असून वाहतूक कधी पूर्ववत होईल, हे अद्याप समजू शकलेले नाही. पावसामुळे या कामात अडथळे येत आहेत.
Part of Road Over Bridge collapsed on tracks near Andheri Station on South end towards Vile Parle . OHE damaged. Traffic on all lines is held up. #WRUpdates @drmbct
— Western Railway (@WesternRly) July 3, 2018
https://twitter.com/MumbaiPolice/status/1013979668570169344
दुसरीकडे या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे बंद पडल्याने प्रवाशांनी रस्ते मार्गाने ऑफीस गाठण्याचा प्रयत्न केला. यात पावसाची भर पडल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली. त्यामुळे मंगळवारी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.


पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विरार ते गोरेगाव आणि वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची वाहतूक सुरु आहे. तर हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते वांद्रेपर्यंतची वाहतूक सुरु आहे.
पश्चिम रेल्वेची हेल्पलाईन
WR HelpLine numbers in view of affected traffic In Mumbai are as under :-
Andheri –
022676 30054
Churchgate –
02267622540
Borivali-
02267634053
Mumbai Central-
02267644257#WRUpdates @drmbct— Western Railway (@WesternRly) July 3, 2018
दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून यातील चार जण किरकोळ जखमी आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमींवर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
#MumbaiRains अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळला #Andheri https://t.co/ZfyIjgJO7V pic.twitter.com/5DkaaPLRs2
— LoksattaLive (@LoksattaLive) July 3, 2018
बोरिवलीतून दक्षिण मुंबईसाठी १८ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर बोरिवली आणि वांद्रे या स्थानकांच्या दरम्यान २७ विशेष बस चालवल्या जाणार आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
