सामाजिक न्याय विभागाच्या राज्यातील सर्व मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये मध्यवर्ती भोजनालय (सेन्ट्रल किचन) सुरू करून सकस आहार आणि गरम अन्न विद्यार्थ्यांना देणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत आज नागपूर जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्याबाबतचा प्रश्न आमदार मोहन मते यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी सेंट्रल किचन योजना सुरू करण्याबरोबरच विभागातील वसतिगृहाच्या बदलाबाबत अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या.

गड्डीगोदाममधील वसतिगृहाचा गृहपाल बदलला

नागपुरातील गड्डीगोदाम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. सभागृहात हा मूळ मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सामाजिक न्याय मंत्र्यांनी वसतिगृहाच्या गृहपालाची बदली करण्यात आली असून वसतिगृहातील भोजन पुरवठादारही बदलण्यात आला असल्याची माहिती सभागृहात दिली.

सर्वच वसतिगृहांचे अपग्रेडेशन करणार, सीसीटीव्ही बसवणार

सामाजिक न्याय विभागाच्या सर्व आश्रमशाळा, वसतिगृहांचे महानगरांपासून ते गडचिरोलीच्या सिरोंचापर्यंत आधुनिकीकरण (अपग्रेडेशन) करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लवकरच मुला-मुलींच्या वसतिगृहात सीसीटीव्ही बसवून विद्यार्थ्यांना सुरक्षितता देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central kitchen scheme to be launched in social justice department hostels says dhananjay munde aau
First published on: 27-02-2020 at 19:31 IST