दहा रुपये कमी दिल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका चिकन विक्रेत्याला आपला प्राण गमवावा लागला. लोअर परळ येथील धनमील कंपाऊंडजवळ सोमवारी ही घटना घडली. फिरोज शेख असे या हल्ल्यात मरण पावलेल्या चिकन विक्रेत्याचे नाव आहे.
लोअर परळ येथील धनमील नाक्यावर पालिका कार्यालयासमोर फिरोज शेख (३५) याचे चिकनचे दुकान आहे. सोमवारी दुपारी याच भागात वडापाव विक्री करणारे कुंदन चौधरी (२४), संजय कुमार भारती ९२०) आणि दामोदर साहू (२०) हे तिघे जण फिरोजच्या दुकानात कोबंडीचे मटण घेण्यासाठी गेले होते. फिरजने त्यांना १०५ रुपयांचे मटण दिले. परंतु या तिघांनी फिरोजला १० रुपये कमी दिले. त्यामुळे फिरोजने त्यांना जाब विचारला. त्यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद वाढल्याने मारामारी झाली. या तिघांनी फिरोजला बेदम मारहाण केली. त्यात फिरोज बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी हत्येप्रकरणी या तिघांना अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2015 रोजी प्रकाशित
दहा रुपयांच्या वादातून कोंबडी विक्रेत्याची हत्या
दहा रुपये कमी दिल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका चिकन विक्रेत्याला आपला प्राण गमवावा लागला. लोअर परळ येथील धनमील कंपाऊंडजवळ सोमवारी ही घटना घडली.
First published on: 28-01-2015 at 12:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chicken trader murder for ten rupee