मंत्रालयात दुरुस्तीचे काम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. हा मजूर तिसऱ्या मजल्यावर काचा पुसत होता.
मंत्रालयाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून अनेक मजूर येथे कामावर आहेत. यापैकी रघुवर वाल्मिक विश्वकर्मा (२०)याचा तोल जाऊन खाली पडल्यामुळे मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता अधिक माहिती मिळू शकली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2013 रोजी प्रकाशित
मंत्रालयात पडून मजुराचा मृत्यू
मंत्रालयात दुरुस्तीचे काम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.
First published on: 12-08-2013 at 03:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contract worker fall from high place died in mantralaya