29 September 2020

News Flash

coronavirus : नवी मुंबईत दिवसभरात 62 पॉझिटिव्ह रुग्ण

सर्वाधिक तुर्भे विभागात तर सर्वात कमी बेलापूर व दिघा  नोड मध्ये आढळले रुग्ण

संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई मनपा क्षेत्रात आठवड्यापासून कोरोना रुग्णाचा आकडा पन्नासच्या खाली येत नसून रविवारीही तब्बल ६२ नागरिकांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात सर्वाधिक तुर्भे विभागात तर सर्वात कमी बेलापूर व दिघा  नोड मध्ये रुग्ण आढळून आले आहेत.

कोविड  प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने तातडीने करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने १७  मे रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये आज नव्याने ६२  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकूण कोरोना पॉझिटिव रुग्णांचा आकडा आता एक हजार ११०  वर पोहोचला आहे. रविवारी प्राप्त अहवालात  बेलापूर एक, नेरूळ चार, वाशी चार, तुर्भे २३  कोपरखैरणे  २०  घनसोली ४  ऐरोली ५  दिघा एक येथील रुग्ण आहेत, तरी या रुग्णांना पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले असून यांचे रहिवासी क्षेत्र निर्जंतुकीकरण करून कंटेनमेंट म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनामुळे चार  जणांचा मृत्यू झालेला असून, एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची सख्या ३१ झाली आहे. तसेच विभाग निहाय कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांची सख्या ४२ असून यात बेलापूर ६, नेरूळ ३ वाशी १३ तुर्भे ७ कोपरखैरणे १० घणसोली २ तर ऐरोली येथे एका रुग्णाचा समावेश आहे.

तिसऱ्या टाळेबंदीचा रविवारी शेवट झाला असला तरी टाळेबंदी हटवण्यात आली नसून चौथी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. यात मद्याच्या दुकानांना परवानगी देण्यात आली नसल्याने, मद्यप्रेमींची निराशा झाली आहे. मात्र सब रजिस्टर कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोमवार पासून खुले राहणार आहेत. मात्र या दोन्ही कार्यालयात सुरवातीला केवळ १० % उपस्थिती आवश्यक आहे. अशी माहिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 10:03 pm

Web Title: coronavirus 62 positive patients in navi mumbai in a day msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 चिंताजनक! मुंबईत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ओलांडला २० हजारांचा टप्पा
2 “वानखेडे मैदान ताब्यात घेणार नाही”, महापालिका आयुक्तांनी केलं स्पष्ट
3 मुंबईत एका दिवसात ८८४ जणांना संसर्ग
Just Now!
X