24 September 2020

News Flash

सीएसएमटी स्थानकात लोकल ट्रेन बफरला धडकली

या अपघातामुळे लोकल सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात हार्बर मार्गावर लोकल ट्रेनने बफरला धडक दिल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून या अपघातामुळे लोकल सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली आहे.

शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास पनवेलवरुन येणारी ट्रेन सीएसएमटी स्थानकात पोहोचली. प्लॅटफॉर्म क्रमांक एक येथे ही ट्रेन येत होती. प्लॅटफॉर्मच्या शेवटी सुरक्षेच्या दृष्टीने बफर असून लोकल ट्रेनने बफरला धडक दिली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताची चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या अपघातामुळे हार्बर मार्गारील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:36 pm

Web Title: csmt harbour railway local train hit buffer traffic disruption on platform number one
Next Stories
1 बलात्कार आणि हत्याप्रकरणी तीन वर्षांनंतर पुन्हा खटला
2 मंगेशकर यांची गायकी समाजाला कार्यप्रवृत्त करणारी!
3 विद्यापीठाचा ६९५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
Just Now!
X