परळ आणि करी रोड या दोन्ही स्थानकांवर लष्कराकडून पादचारी पूल उभारण्यात येत आहेत. या पादचारी पुलांसाठी गर्डर टाकण्याचे काम आज केले जाणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येऊन कुटुंबासोबत जिवाची मुंबई करायचा तुमचा विचार असेल तर तो टाळा! कारण सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत दादर ते सीएसएमटी दरम्यान एकही लोकल धावणार नाही. तसेच सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४.३० पर्यंत या डाऊन जलद आणि अप डाऊन धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.

दादर स्थानकात सीएसएमटीला जाणारी पहिली लोकल दुपारी ४. ३८ ला येईल. तर सीएसएमटीहून पहिली जलद लोकल दुपारी ३.४० वाजता सुटेल. सीएएसएमटीहून पहिली धिमी लोकल दुपारी ३.५० ला सुटेल. ब्लॉक काळात अप दिशेने येणाऱ्या लोकल दादर आणि कुर्ला या स्थानकांपर्यंतच चालवण्यात येतील. याच स्थानकातून काही लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्सहार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. मात्र मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेववर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत.

आज रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक ११००९ आणि ११०१०
सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक २२१०१ आणि २२१०२
सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी
राज्यराणी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१२३ आणि १२१२४
सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी
डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१०९ आणि १२११०
सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी
पंचवटी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१२५ आणि १२१२६
सीएसएमटी-पुणे- सीएसएमटी
प्रगती एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक १२१३९
सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक ११०२३ सीएसएमटी कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस

दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुंबईत येण्याचा विचार करत असाल तर तो थोडा बाजूला ठेवा.