करोनाचा कहर देशासह जगभरात पसरला आहे. अशात हँड सॅनिटायझरची मागणी वाढते आहे. प्रमाणित कंपन्यांच्या सॅनिटायझरसोबत बोगस सॅनिटायझरचा सुळसुळाट वाढला आहे. कारण सध्या बाजारात प्रमाणित सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बोगस सॅनिटायझर अवाच्या सवा किंमतीला विकून ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम सुरु आहे. अशा आता आम्ही तुम्हाला सांगतो आहोत की बोगस सॅनिटायझर कसा ओळखाल?

गेल्या ८ ते १२ दिवसात काय घडलं आहे? 

१) हँड वॉश, हँड सॅनिटायझर यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

२) ग्राहकांची मनात हँड सॅनिटायझर वापरण्याची सजगता निर्माण झाली आहे

३) बोगस सॅनिटायझर्स निर्माण करुन ती अवाच्या सवा किंमतीला विकली जात आहेत

कसं ओळखाल बोगस सॅनिटायझर?

मुंबईत मेड इन वाकोला, मेड इन चारकोप असं बारीक टाइपमध्ये लिहिलेली सॅनिटायझर्स मिळत आहेत

तेव्हा सॅनिटायझर खरेदी करताना प्रमाणित कंपनीचं नसेल तर विकणाऱ्या माणसावर विश्वास न ठेवता ते नीट तपासून पाहा

संस्कार आयुर्वेद हँड सॅनिटायझर अशा नावानेही बोगस सॅनिटायझर विकलं जात आहे ते कुठे बनवलं गेलं आहे हे तपासा.

संस्कार आयुर्वेद हँड सॅनिटायझर हेदेखील मेड इन वाकोला आहे. त्यामुळे ते खरेदी करुन हात स्वच्छ करत असाल तर सावधान!

वाकोल्यातल्या संस्कार आयुर्वेद या छोटेखानी कंपनीवर निकृष्ट दर्जाचं सॅनिटायझर बनवलं जात होतं. तिथे छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.

मेड इन चायना याला टक्कर देणारे काही ब्रँड बाजारात आले आहेत तेव्हा त्यापासून सावधान

१०० ते १५० ML हँड सॅनिटायझर जास्त किंमतीला विकलं जातं आहे.

१२ मार्चला एफडीएने धाड टाकून जवळपास १ लाख किंमतीचा कच्चा माल आणि इतर साधनं जप्त केली आहेत.

एफडीएने कारवाई करुनही बोगस सॅनिटायझर्स मुंबईत विकले जात आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. प्रमाणित कंपन्यांच्या सॅनिटायझर्सचा तुटवडा निर्माण झाल्याने सध्या बाजारात बोगस सॅनिटायझर्सचा सुळसुळाट आहे. तेव्हा करोनामुळे काळजी घेणं चांगलं पण बोगस सॅनिटायझर तर खरेदी करत नाही आहात ना? हे एकदा तपासा म्हणजे सुरक्षिततेच्या नावाखाली तुमचा खिसा कापला जाणार नाही. नामांकित ब्रँड नाहीत म्हणून हे सॅनिटायझर्स विकत असल्याचं उत्तर मेडिकलवाले देतात. मात्र अशा मेडिकलवाल्यांपासूून सावधान!