News Flash

डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची मुंबई महापालिकेला नोटीस

दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

डॉ. दीपक अमरापूरकर (संग्रहित छायाचित्र)

बॉम्बे रुग्णालयातील डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टाने महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही कोर्टाने संबंधीत यंत्रणांना दिले आहेत.

मंगळवारी मुंबईतील अतिवृष्टीत बेपत्ता झालेले डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी समुद्राच्या किनाऱ्याजवळ सापडला होता. मंगळवारी दुपारी एल्फिन्स्टन परिसरात पाणी साचल्यामुळे अमरापूरकर कारमधून उतरले आणि चालत प्रभादेवीतील घराच्या दिशेने निघाले होते. मात्र यादरम्यान त्यांचा पाय उघड्या मॅनहोलमध्ये गेला आणि त्यात ते वाहून गेले होते. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे डॉ. अमरापूरकर यांना जीव गमवावा लागला अशी भावना व्यक्त होत होती.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाला असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. शुक्रवारी या याचिकेवर मुंबई हायकोर्टासमोर सुनावणी झाली. हायकोर्टाने महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना नोटीस बजावत दोन आठवड्यात याप्रकरणावर उत्तर देण्याचे निर्देश दिले.

महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे डॉ. अमरापूरकर हे मॅनहोलमध्ये पडले. त्यामुळे महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. महापालिकेसह मुख्यमंत्री, राज्य सरकार, पोलीस आयुक्त,  पर्जन्यजल निचरा विभाग यांनाही याप्रकरणात प्रतिवादी करण्यात आले होते. आता हायकोर्टात महापालिका आणि अन्य यंत्रणा काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 2:50 pm

Web Title: dr deepak amrapurkar death case mumbai high court issues notice to bmc asks them to reply in 2 weeks
टॅग : Bmc,Bombay High Court
Next Stories
1 तीन दिवसांपासून कसारा- टिटवाळा रेल्वे सेवा ठप्प; संतप्त प्रवाशांचा वाशिंदमध्ये रेलरोको
2 भेंडीबाजार इमारत दुर्घटना; मृतांचा आकडा ३४ वर
3 संक्रमण शिबिरात न जाण्याचा हट्ट नडला!
Just Now!
X