News Flash

रेल्वेमार्गातील पूरस्थितीवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष

अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी ठिकठिकाणी बोटी

अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी ठिकठिकाणी बोटी

मुंबई : पावसाळ्यात रुळांवर साचणारे पाणी आणि निर्माण होणाऱ्या पूरस्थितीला तोंड देण्यास मध्य रेल्वे यंदा सज्ज झाली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास त्यातून प्रवाशांची सुखरूपपणे सुटका करता यावी यासाठी मध्य रेल्वेने बोटी खरेदी के ल्या असून त्या विविध ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय पावसाळ्यात उपनगरीय मार्गावरील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी यंदा ड्रोन कॅ मेऱ्यांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळच रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेमार्ग बंद झाले होते. सर्व बाजूंनी पाण्याचा वेढा पडल्याने एक हजार प्रवासी असलेली महालक्ष्मी एक्स्प्रेसही अडकली होती. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दल, एनडीआरएफ व स्थानिक पालिकांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. त्यानंतर गेल्या वर्षी पडलेल्या पावसाळ्यात मुंबईतील मशीद रोड, सॅन्डहर्स्ट रोड, भायखळासह अनेक ठिकाणी रुळांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. लोकल व मेल-एक्स्प्रेस  जागीच उभ्या राहिल्याने अनेक प्रवासी त्यात अडकले होते. त्यांचीही सुखरूपपणे सुटका करण्यात आली. त्यावेळी राज्य सरकार, एनडीआरएफच्या मदतीने प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बोटींचा वापर करण्यात आला होता. अशा घटनांनंतर मध्य रेल्वेने आता स्वत:च बोटी खरेदी करून त्या पावसाळ्यात विविध ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, अग्निशमन दलाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी अंबरनाथ, बदलापूर येथे बोटीचा वापर कसा करावा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. दुपारी तीन ते सायंकाळी सहापर्यंत हे प्रशिक्षण सुरू होते. मे अखेपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे.

या बोटी सीएसएमटी, दादर, कु र्ला, ठाणे व बदलापूर येथे सज्ज असतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.  रेल्वे सुरक्षा दलातील काही कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’कडून पूरस्थितीत बचावकार्य कसे करावे, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मशीद रोड, शीव, ठाणे व कल्याण येथे हे कर्मचारी तैनात असतील, असे सुतार यांनी सांगितले.

पावसाळय़ातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅ मेऱ्यांचाही वापर के ला जाणार आहे. सध्या दोन ड्रोन कॅ मेरे आहे. नुकतीच या कॅ मेऱ्यांची चाचणी कल्याण व त्यापुढील स्थानकांपर्यंत करण्यात आली. सध्या या कॅ मेऱ्यांचा वापर कारशेड, यार्डमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचा मागोवा काढण्यासाठी के ला जात आहे. पावसाळ्यात मात्र संपूर्ण उपनगरीय मार्गावर या कॅ मेऱ्यांचे लक्ष असेल. ते हाताळण्यासाठी एक विशेष पथकही असेल. कॅ मेरे हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याला  सोबतच असलेल्या स्क्रीनवर पूरस्थिती किं वा एखादी आपत्कालीन परिस्थिती दिसल्यास तात्काळ त्याची माहिती नियंत्रण कक्ष, स्टेशन मास्तर व वरिष्ठांना देण्यात येईल. त्यामुळे वेळीच मदत पोहोचवण्यात यश मिळेल. शिवाय बचावकार्यातही त्याचा वापर करता येणार आहे.

मध्य रेल्वे सज्ज

* रेल्वे सुरक्षा दल, महाराष्ट्र सुरक्षा दल यांचे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात के ले जाणार आहे.

* सीसीटीव्हीद्वारेही स्थानकातील प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार.

* पाणी साचून लोकल विस्कळीत होऊ नये यासाठी रुळांची उंची वाढवणे, सिग्नल व ओव्हरहेड वायर दुरुस्ती कामे हाती घेण्यात आली आहेत.

* नालेसफाईची कामेही घेतली असून स्थानकाजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचेही काम सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 2:32 am

Web Title: drone cameras use to monitor flood situation on the railway line zws 70
Next Stories
1 ड्रीम्स मॉलमधील अग्नितांडव : अहवाल परस्पर प्रसारमाध्यमांना मिळाल्याने नगरसेवकांचा संताप
2 पहिली मात्रा न घेतलेल्या पोलिसांचा शोध
3 रेमडेसिविर खरेदीत तरुणाची फसवणूक
Just Now!
X