25 September 2020

News Flash

प्रदूषणाच्या समस्येवर आजपासून विचारमंथन

दोन दिवसांच्या या परिषदेचे हे पर्व ‘वर्तमानातील प्रदूषण : आव्हान आणि उपाययोजना’ या विषयावर होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन 

दिल्लीतील हवा प्रदूषण चर्चेत असते, मग महाराष्ट्रातील स्थिती काय आहे? राज्यातील नदी प्रदूषणाचे दुष्परिणाम नेमके काय होतात? प्लास्टिक बंदी झाली, आता तरी प्रश्न सुटतील का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज बुधवारी (१९ डिसेंबर) ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमातून मिळणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेचे हे पर्व ‘वर्तमानातील प्रदूषण : आव्हान आणि उपाययोजना’ या विषयावर होत आहे.

परिषदेचे उद्घाटन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता होईल. या वेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर हेही संवाद साधतील.

उद्घाटन सत्रानंतर ‘पर्यावरण : दिल्ली आणि महाराष्ट्र’, ‘जलशुद्धीकरणाचे पर्याय’, ‘या प्लास्टिकचे करायचे काय?’ या विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई रवींद्रन, के. ई. एम रुग्णालयातील श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अमिता आठवले, पर्यावरण विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, जलदिंडीचे संस्थापक डॉ. विश्वास येवले, पोटविकारतज्ज्ञ डॉ. आकाश शुक्ला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के, पॉलिमर केमिस्ट डॉ. जयंत गाडगीळ, सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. मेधा ताडपत्रीकर, पर्यावरण अभ्यासक डॉ. नागेश टेकाले या सत्रांमध्ये मार्गदर्शन करतील.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (गुरुवार, २० डिसेंबर) ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, बीएआरसीमधील संशोधक डॉ. शरद काळे, पर्यावरण कार्यकर्त्यां स्वाती देव मार्गदर्शन करतील. ‘आम्ही आणि आमचे प्रदूषण!’ या सत्रात सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे साहाय्यक सचिव डॉ. पुंडलिक मिरासे, सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे, प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव संवाद साधतील.

‘प्रदूषण आणि समाजमाध्यमे’ या विषयावरील चर्चेत माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे सहभागी होतील. पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचे ‘प्रदूषण आणि आंतरराष्ट्रीय नियमावली’ या विषयावर विशेष व्याख्यान होईल. पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल.

सहप्रायोजक..

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत, एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर आणि नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता बदलता महाराषट्र’मध्ये ‘वर्तमानातील प्रदूषण : आव्हान आणि उपाययोजना’ ही परिषद होत आहे. रिअल इस्टेट मॉल हे या पर्वाचे पॉवर्ड बाय पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 1:52 am

Web Title: from todays thoughts on the issue of pollution
Next Stories
1 श्रद्धानंद आश्रमातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता
2 मुंबईतील मालाड भागात असलेल्या बंगल्याला आग
3 आमचा विकास ‘आदर्श’ सारखा नाही-पंतप्रधानांचा टोला
Just Now!
X