मुंबई : ऑनलाईन भामटय़ांनी वस्तू व सेवा कर(जीएसटी) विभागाच्या अधिक्षकाला रविवारी दोन लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी अ‍ॅन्टॉपहिल पोलीस तपास करत आहेत.

अ‍ॅन्टॉपहिल येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या जीएसटी अधिक्षकाकडे क्रेडीट कार्ड आहे. रविवारी अनोळखी क्र मांकावरून त्यास एक लघुसंदेश प्राप्त झाला. के वायसी अद्ययावत न केल्यास बॅंक खाते बंद केले जाईल, अशी सूचना त्यात होती. अधिक्षकाने तातडीने लघुसंदेशात दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने बोलण्यात गुंतवून अधिक्षकाला ‘क्वीक सपोर्ट’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तसेच क्रेडीट कार्ड आणि बॅंक खात्याची माहितीही घेतली. ही माहिती देताच अधिक्षकाच्या क्रेडीट कार्डवरून एक लाख ८१ हजार रुपये अन्य खात्यांमध्ये वळते के ले गेले. तर १० हजार रुपये बॅंके तून काढण्यात आले. हे व्यवहार पूर्ण झाल्यावर संबंधीत बॅंके ने संपर्क साधून हे व्यवहार तुम्ही के लेत का? अशी विचारणा के ली. अधिक्षकाने नकार कळवताच बॅंके ने क्रेडीट कार्ड ब्लॉक के ले.

क्वीक सपोर्ट, एनी डेक्क, टीम व्यूव्हर ही अ‍ॅप संगणक किं वा भ्रमणध्वनी परस्पर हाताळणीची मुभा उपलब्ध करून देतात. संगणकावर, भ्रमणध्वनीवरील प्रत्येक हालचाल समोरील व्यक्ती पाहू शकते. स्वत:हून हालचाली करू शकते. ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक ओटीपी क्र मांक भामटे परस्पर मिळवू शकतात. तसेच संवेदनशील तपशील सहज चोरू शकतात.