मुंबईसह राज्याच्या वेगवेगळया भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत पावसाने आता विश्रांती घेतली आहे. पावसामुळे वेगवेगळया दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. वडाळयात रस्ता खचून सात गाडयांचे मोठे नुकसान झाले. मुंबईसह शेजारच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. या मुसळधार पावसाचा मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मुुंबईच्या तिन्ही मार्गावर रेल्वे गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या तर आठ ठिकाणी पाणी साचल्यामुळे बेस्टने बसेसचे ४७ मार्ग बदलले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
विराट पवार

पावसाचा जोर ओसरल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकात झालेली गर्दी

– मुंबईच्या कुठल्या भागात किती पाऊस झाला
कुलाबा – ९९ मिमि
सांताक्रूझ – १८१ मिमि
कांदिवली – २३४ मिमि
गोरेगाव – १७५ मिमि
घाटकोपर – २१५ मिमि
सीएसटी – १८४ मिमि
मुलुंड -१९४ मिमि
माटुंगा -१९८ मिमि
माहिम/धारावी – १९१ मिमि
दहीसर – २४१ मिमि

– मालाडच्या एव्हरशाईन नगर परिसरातील नाल्यात पडून एका १८ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू.

-मुंबईत कुठेच पाणी तुंबले नाही उलट महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चांगले काम केले – मुंबईच्या महापौरांनी थोपटली पाठ

-विरार आणि सूरत दरम्यान मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे वांद्रे, दादर टर्मिन्स आणि मुंबई सेंट्रल येथे मेल एक्सप्रेस उशिराने पोहोचण्याची शक्यता.

-अंबरनाथमध्ये वडोळ गावात अंबरनाथ पालिकेच्या मलशुद्धीकरण केंद्राची भिंत पडून एकाचा मृत्यू.

– कर्नाळया जवळचा पूल खचल्याने मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक ठप्प, गेल्या तीन तासांपासून वाहतूक ठप्प, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

– रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच काळात ( एक जून ते २५ जून ) दरम्यान पडलेल्या पावसाच्या दुप्पट पाऊस झाला आहे.

– रायगड जिल्ह्यातही २४ तासात मुसळधार पाऊस कोसळला आहे.
एकूण सरासरी ९८ मिमि
पेण १६० मिमि
अलिबाग १५६ मिमि
पनवेल १५८ मिमि
उरण १०६ मिमि
सुधागड १३० मिमि
माथेरान १५५ मिमि

– वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात दोस्ती पार्क इमारतीजवळील रस्ता खचल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. रस्ता खचल्याने इमारतीची संरक्षक भिंत देखील कोसळली असून या घटनेत सुमारे सात गाड्यांचे नुकसान झाले आहे.

– पालघर जिल्ह्याच्या वेगवेगळया भागांमध्ये इतक्या पावसाची नोंद
वसई – १७३ मिमि
वाडा – १०१ मिमि
डहाणू – १७४.७ मिमि
पालघर -१४१.३ मिमि
जवाहर – १३० मिमि
मोखाडा – २७.६ मिमि
तलासरी – २१०.२ मिमि
विक्रमगड -१५२.५ मिमि

-मुंबईत मागच्या २४ तासात २०० मिमि पेक्षा जास्त पाऊस, सांताक्रूझमध्ये २३१ मिमि पावसाची नोंद.

– कुलाब्यात सकाळी ५.३० वाजेपर्यंत ९० मिमि पावसाची नोंद.

– खार, मालाड, अंधेरी सबवेमध्ये साचले पाणी.

– सांताक्रुजमध्ये मागील २१ तासात १९५ मीलीमीटर पाऊस. दिवसभरात पावसाचा जोर वाढणार.

– पुढच्या १२ तासात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा स्कायमेटचा अंदाज.

– मुंबई शहर आणि उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस.

– मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

– सायन, चेंबूरमध्ये सखल भागात साचले पाणी.

– हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात.

– मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक उशिराने.

– ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये जोरदार पाऊस.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in mumbai
First published on: 25-06-2018 at 07:43 IST