22 September 2019

News Flash

दहीहंडी निमित्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर

विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे

संग्रहित छायाचित्र

दहीहंडी उत्सव असल्याने शनिवारी म्हणजेच उद्या नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून 24 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालकांना यासंदर्भातले पत्रच डॉ. सुवर्णा खरात सह सचिव महाराष्ट्र शासन यांनी लिहिलं आहे. पुण्यातल्या शाळांना मात्र सुट्टी देण्यात आलेली नाही.

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा जोर जरा जास्त प्रमाणात असतो. राज्यभरातच दहीहंडी उत्साहात साजरी केली जाते. मात्र या तीन शहरांमध्ये विशेष उत्साह असतो. सात, आठ किंवा कधी कधी नऊ थर रचत दहीहंडी फोडली जाते. या सगळ्या उत्सव काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

First Published on August 23, 2019 9:47 pm

Web Title: holiday declare tomorrow for dahihandi in mumbai navi mumbai and thane scj 81
टॅग Gokulashtami 2019