25 February 2021

News Flash

दिवंगत वली मोहम्मद भामला चौकाचं विवेक गोयंका, डी. वाय. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

दिवंगत वली मोहम्मद भामला चौकाची निर्मिती वस्तुंच्या पुनर्वापरातून करण्यात आली आहे

दिवंगत वली मोहम्मद भामला चौकाची निर्मिती वस्तुंच्या पुनर्वापरातून करण्यात आली असून या पर्यावरणप्रेमी चौकाचं उद्घाटन इंडियन एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक गोयंका व पद्मश्री डी. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, खासदार पूनम महाजन, प्रिया दत्त, भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रताप सरनाईक, आरीफ नसीम खान व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहीर उपस्थित होते. दिवंगत वली मोहम्मद भामला हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अल्पसंख्याक व मागासवर्गातील जनतेच्या उद्धारासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अथक परीश्रम घेतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:30 pm

Web Title: inauguration of late vali mohammad bhamla chowk
Next Stories
1 मराठी वृत्तपत्राच्या वेबसाइटवर आक्षेपार्ह पोस्ट, सायबर सेलकडून इसमाला अटक
2 मुंबईत सोमय्या, पुण्यात डी.वाय. पाटील खासगी विद्यापीठांच्या स्थापनेस मान्यता
3 शिवसेनेच्या विरोधात पाच ठिकाणी राणेंचे उमेदवार
Just Now!
X