13 August 2020

News Flash

भुजबळ काका-पुतण्यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ जूनपर्यंत वाढ

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून छगन भुजबळ मुंबईत कोठडीत आहेत

Chhagan Bhujbal : भुजबळांना प्रचंड ताप आणि अंग दुखीचा त्रास होत असल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम घोटाळ्यासह अन्य आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी सध्या कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत बुधवारी ७ जूनपर्यंत वाढ करण्यात आली. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून छगन भुजबळ मुंबईत कोठडीत आहेत. त्यांनी केलेला जामीन अर्जही न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापित विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश पी. आर. भावके यांनी भुजबळ काका-पुतण्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला. यापूर्वी छगन भुजबळ यांनी आपल्याला वृद्ध म्हणून नव्हे, तर प्रकृती खूपच खालावली असल्याने जामीन देण्याची केलेली विनंती विशेष न्यायालयाने फेटाळली होती. भुजबळ यांच्या प्रकृतीची आवश्यक ती काळजी घेण्यात येत असून, त्यांना या कारणासाठी जामीन देण्याची गरज नसल्याचा दावा ‘ईडी’ने जामिनाला विरोध करताना केला होता. तो न्यायालयाने मान्य केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 1:01 pm

Web Title: judicial custody of chhagan bhujbal sameer bhujbal extended
Next Stories
1 Hsc result 2016 : बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी; निकालाची टक्केवारी घसरली
2 सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ‘झोपु’मध्ये घरे !
3 बालवाडय़ांचे प्रवेशही कायद्याच्या कक्षेत?
Just Now!
X