25 September 2020

News Flash

लोकलमधून पडून तरूण जखमी

ठाकुर्ली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गेल्या दोन दिवसात दोन जण लोकलमधून पडून मरण पावल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज सकाळी बदलापूर लोकलमधून पडून एक तरूण

| January 24, 2014 12:03 pm

ठाकुर्ली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गेल्या दोन दिवसात दोन जण लोकलमधून पडून मरण पावल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज सकाळी बदलापूर लोकलमधून पडून एक तरूण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शीवच्या लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बदलापूरहून सकाळी साडे सात वाजता सीएसटीकडे जाणारी लोकल विजय गायकवाड या तरूणाने पकडली. लोकलमध्ये गर्दी असल्याने तो दरवाजात ऊभा राहून प्रवास करीत होता. गर्दीच्या रेटय़ामुळे त्याचा हात सटकून तो खाली पडला. लोकलचा वेग कमी असल्याने त्याच्या जीवावर बेतले नाही. पण तो गंभीर जखमी झाल्याने त्याला मुंबईला हलविण्यात आले, असे सुत्रांनी सांगितले.
कोपर येथे राहणारी सुनंदा सारंग ही वृध्द महिला दिवा रेल्वे स्थानक परिसरात लोकलमधून पडून मरण पावली. तर अशीच घटना ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात घडून संदीप साळवी हा रेल्वे मार्ग ओलांडत असताना लोकलने दिलेल्या धडकेत मरण पावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 12:03 pm

Web Title: man injured after falling from local train
टॅग Local Train
Next Stories
1 नव्या धोरणात शाळा, रुग्णालयांवर मोबाइल टॉवर उभारण्यास बंदी
2 सरकारी योजनेतील गरिबांची तीन हजार घरे हडप
3 केजरीवालांपेक्षा राखी सावंतने उत्तम राज्य केले असते – शिवसेना
Just Now!
X