News Flash

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर ब्लॉकचे काम होणार आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामांसाठी यंदाच्या रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर ब्लॉकचे काम होणार आहे.

हार्बरवरही कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन तर पश्चिम रेल्वे मार्गावरदेखील बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर ब्लॉक असेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हार्बर मार्ग

* कधी- रविवार, २२ एप्रिल, २०१८. स. ११.१० ते सायं.४.१० वा

* कुठे- कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्ग

* परिणाम- सीएसटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यान अप-डाऊन मार्गावरील लोकल गाडय़ा रद्द. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल आहेत.

मध्य रेल्वे- मुख्य मार्ग

* कधी- रविवार, २२ एप्रिल, २०१८. स.११.१० ते सायं.४.१० वा

* कुठे- मुलुंड ते माटुंगा अप धीम्या मार्गावर

* परिणाम- ब्लॉक दरम्यान कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर चालविण्यात येतील. अप धीम्या मार्गावरील नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार स्थानकात लोकल गाडय़ांना थांबा देण्यात येणार नाही.

पश्चिम रेल्वे

* कधी- रविवार, २२ एप्रिल, २०१८. स.१०.३५ ते दु.३.३५ वा.

* कुठे- बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर

* परिणाम- बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविणार. बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक एक ते चार नंबरवर तसेच राम मंदिर स्थानकातही कोणतीही लोकल थांबणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:06 am

Web Title: mega block announced on all the three railway lines in mumbai on sunday
Next Stories
1 बेकायदा बांधकामांमध्ये राहणारे सगळेच गरीब?
2 कॉर्पोरेट क्षेत्रात पूर्वीसारखा लिंगभेद नाही
3 मुंबईतील ब्रीच कँडी भागातील शोरुम्सना भीषण आग
Just Now!
X