८४ दिवसानंतर १५ जून रोजी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल रेल्वे धावली. त्यानंतर आता १३ दिवसांनी म्हणजेच २८ जून रोजी रेल्वेने मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं आयकार्ड दाखवून लोकल रेल्वेने (उपनगरीय रेल्वे) प्रवास करत आहेत. सर्वसामान्यांसाठी रेल्वेचे दरवाजे सध्या बंदच आहे.

या मार्गावर आहे मेगाब्लॉक –

मुख्य मार्ग (Main Line)

अप व डाउन जलद मार्गावर विद्याविहार – मुलुंड दरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० पर्यंत या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे.

सकाळी १०.१६ ते दुपारी २.१७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या डाउन जलद विशेष लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धिम्या (स्लो) मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर थांबतील त्यानंतर मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

दुपारी १२.४१ ते दुपारी ३.२५ या वेळेत ठाणे येथून सुटणा-या जलद विशेष लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर कळविण्यात येऊन निर्धारित थांब्यांवर थांबविण्यात येतील आणि माटुंगा येथे अप जलद (फास्ट) मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर लाइन
पनवेल- वाशी दरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.०० पर्यंत पनवेलला जाणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत.

पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१५ ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही.

मेगा ब्लॉक कालावधीत विशेष लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – मानखुर्द- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशा धावतील.