News Flash

आज मेगा ब्लॉक

या काळात सांताक्रुझ ते महालक्ष्मी स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावरून सोडण्यात येईल.

| October 12, 2014 01:32 am

*कधी – सकाळी १०.३५ ते दु. ३.३५.
*कुठे – सांताक्रुझ ते महालक्ष्मी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर.
*परिणाम – या काळात सांताक्रुझ ते महालक्ष्मी स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावरून सोडण्यात येईल. या काळात जलद मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ा माटुंगा रोड, एल्फिन्स्टन रोड, लोअर परळ, महालक्ष्मी या स्थानकांवर थांबणार नाहीत. या जम्बो मेगा ब्लॉगमुळे काही रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात येतील.

*कधी – सकाळी ११.०० ते दु. ३.३०.
*कुठे – ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर.
*परिणाम – धीम्या आणि निमजलद मार्गावरील रेल्वे सेवा मुलुंड येथून डाऊन जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहे. मुलुंड आणि कल्याणदरम्यान या गाडय़ा ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील. डाऊन धीमी सेवा कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपलब्ध होणार नाही. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून डाऊन जलद मार्गावरून सुटणाऱ्या गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकावर थांबतील. ठाणे स्थानकातून अप जलद मार्गावरून सुटणाऱ्या गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकात थांबतील. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सकाळी १०.०० ते दुपारी ४ या वेळेत येणाऱ्या आणि सुटणाऱ्या गाडय़ा १५ मिनिटे विलंबाने धावतील.

*कधी – सकाळी ११.०० ते दु. ३.००.
*कुठे – कुर्ला ते मानखुर्द अप आणि डाऊन धीम्या मार्गावर.
*परिणाम – छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून डाऊन मार्गावरून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या, तसेच  पनवेल, बेलापूर, वाशी येथून अप मार्गावरून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी सुटणाऱ्या गाडय़ा बंद ठेवण्यात
येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 1:32 am

Web Title: mega block on central harbour line
टॅग : Mega Block
Next Stories
1 डेंग्यूचे वाढते थैमान
2 पूर्वेश सरनाईक यांच्याविरोधात खटला
3 जीवनवाहिनी की मृत्यूवाहिनी?
Just Now!
X