News Flash

मुंबईत तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक, लोकल उशिराने धावणार

ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गांवर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम या वेळेत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे तिन्ही रेल्वेमार्गांवरील लोकल सेवा नेहमीच्या वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.

पश्चिम रेल्वे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत मेगाब्लॉक असेल. धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावरुन धावतील. काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील.

हार्बर रेल्वे : नेरुळ ते पनवेल रेल्वेस्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या वेळेत मेगाब्लॉक असेल. नेरुळ ते पनवेलवरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सेवा सकाळी ११. ०१ ते दुपारी ४.२६ पर्यंत बंद. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूकही सकाळी ११.०४ ते दुपारी ४.०४ पर्यंत नेरुळ ते पनवेल दरम्यान बंद असेल. पनवेल ते अंधेरी दरम्यानची वाहतूक देखील बंद. दोन्ही मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते नेरुळ आणि ठाणे ते नेरुळ दरम्यान विशेष लोकल सेवा.

मध्य रेल्वे : मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत मेगाब्लॉक. मुलुंड ते माटुंगादरम्यानची अप जलद मार्गावरील वाहतूक सकाळी १०.५९ ते दुपारी ४.२० पर्यंत अप धीम्या मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. डाऊन जलद मार्गावरील लोकल सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ दरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवर थांबा देणार. सर्व लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील. रत्नागिरी – दादर पॅसेंजर दिवा रेल्वेस्थानकापर्यंतच चालवली जाणार आहे. तिथूनच परतीच्या प्रवासाला ती रवाना होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2017 9:56 am

Web Title: mega block on mumbais all three railway route
Next Stories
1 मुंबई विद्यापीठाचा निम्माच निकाल!
2 मुंबईत हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
3 शिक्षकांच्या वेतनामध्ये तांत्रिक घोळ
Just Now!
X