पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

रेल्वे रूळ, सिग्नल आणि अन्य काही तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल २० मिनिटे उशिराने धावतील. तर हार्बरवर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्याऐवजी शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पाच तासांचा ब्लॉक माटुंगा रोड ते मुंबई सेन्ट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

मध्य रेल्वे

’कधी- रविवार, १० डिसेंबर, सकाळी ११.२० ते दुपारी ४.२०

’कुठे- माटुंगा ते ठाणे डाऊन धिम्या मार्गावर

’परिणाम- माटुंगा ते ठाणे दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. ठाणेनंतर पुन्हा ही वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या कालावधीत डाऊन धिम्या मार्गावरील विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहुर या स्थानकांवर उपनगरी गाडय़ा थांबणार नाहीत. प्रवाशांना घाटकोपर, भांडुप, मुलुंड या स्थानकांपर्यंत जाऊन अप/डाऊन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हार्बर रेल्वे

’कधी- रविवार, १० डिसेंबर, सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

’कुठे- कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर

’परिणाम- सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

’कधी- शनिवार, ९ डिसेंबर, मध्यरात्री १२.०० ते पहाटे ५.००

’कुठे- माटुंगा रोड ते मुंबई सेन्ट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर

’परिणाम- माटुंगा ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने दोन्ही मार्गावरील लोकल गाडय़ा सान्ताक्रुझ ते चर्चगेट दरम्यान  वळविल्या जाणार आहेत.