मुंबई : मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द राहतील, तर काही फेऱ्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप मंद (स्लो)मार्ग, हार्बरवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर सान्ताक्रुझ ते माहीमदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कधी- रविवार, ६ जानेवारी स.११.१० ते दु.३.४० वा

कुठे- मुलुंड ते माटुंगा अप मंद (स्लो)मार्ग

परिणाम- ब्लॉकदरम्यान ठाणे येथून धिम्या मार्गावरून धावणाऱ्या लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर चालवण्यात येतील

हार्बर रेल्वे

कधी- रविवार, ६ जानेवारी. अप मार्ग-स. ११.१० ते दु.३.४० व डाऊन मार्ग-११.४० ते दु.४.१०

कुठे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी, वांद्रे अप व डाऊन मार्ग

परिणाम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव दरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत

पश्चिम रेल्वे

कधी-रविवार, ६ जानेवारी. स.१०.३५ ते दु.३.३५ वा

कुठे- सांताक्रूझ ते माहीम दरम्यान अप व डाऊन जलद मार्ग

परिणाम- ब्लॉकदरम्यान सांताक्रूझ ते माहीम दरम्यान अप व डाऊन मार्गावरील जलद लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.