28 September 2020

News Flash

गणपती बाप्पा मोरया…कोकणात जाणाऱ्यांसाठी मनसेची विशेष बससेवा

कोकणसाठी दादरमधून रवाना झाली पहिली बस

मुंबई : मनसेकडून गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांसाठी विशेष बसेस सोडण्यात येत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेनं विशेष बस सेवा सुरु केली आहे. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आजपासून (शनिवार) या बस सेवेला प्रारंभ झाला असून दादरमधून ही पहिली बस कोकणसाठी रवाना झाली. मनसे आणि महापालिका कामगार-कर्मचारी सेनेच्यावतीनं हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

“गणेशोत्सवानिमित्त लोकांना कोकणात सोडण्याची जबाबदारी खरंतरं राज्य सरकारची होती. त्यांनी ती योग्य पद्धतीनं पार न पाडल्यामुळं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभम्र होता आणि नाराजी देखील होती. त्यामुळे मनसेनंच हा पुढाकार घेऊन उपक्रम राबवला आहे. शहरातील विविध भागांतून अशा बस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत,” अशी माहिती मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली.

“या प्रवासासाठी मनसेच्यावतीनं पॅसेंजर सेफ्टी कीट बनवण्यात आलं आहे. यामध्ये फेस मास्क, हँड ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर, बेडशीट यांचा समावेश आहे. सुमारे अडीचशे बसेसपैकी आज २५ टक्के बसेस दिवसभरात विविध वेळांमध्ये सोडण्यात येणार आहेत. आज १० ते १५ बसेस दादरवरुन सुटणार आहेत. तर काही बसेस या ठाणे, भांडूप आणि इतर भागातून सोडण्यात येणार आहेत. पन्नास प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमधून निम्म्याच प्रवाशांना जाता येणार आहे. चिपळून, महाडपासून कणकवली-सावंतवाडीपर्यंत या बसेस जाणार आहेत,” अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 11:08 am

Web Title: mns started bus service for the employees going to konkan on the occasion of ganeshotsav aau 85
टॅग Ganeshotsav
Next Stories
1 राज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक
2 कंपनी सेक्रेटरी प्रवेश परीक्षा ऑनलाइन
3 मुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त
Just Now!
X