विद्युत यंत्रणेत बिघाड होऊन मेट्रो रखडण्याच्या घटनेला दोन आठवडे उलटत नाहीत तोच आता मोनोरेल रखडण्याची घटना घडली आहे. दोन रूळ जोडणाऱ्या ठिकाणी व्होल्टेजमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारी सायंकाळी सहा ते साडेआठ अशी अडीच तास मोनोरेल सेवा ठप्प होती. या अडीच तासांत मोनोरेलच्या १३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मात्र, मोनोरेलची प्रवासी संख्या नगण्य असल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 18, 2015 4:35 am
Web Title: mono railway disordered