विविध तांत्रिक कामांसाठी आज रविवारी (दि.१) मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य तसेच हार्बर मार्गावरील उपनगरी रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. पश्चिम रेल्वेवर या रविवारी मेगा ब्लॉक नाही.

मध्य रेल्वे

कुठे – मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग

कधी – स. ११.१५ ते दु. ३.४५

परिणाम – कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ या काळात सुटणाऱ्या लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावर चालवण्यात येतील, दरम्यानच्या सर्व मार्गावर थांबतील. परळनंतर अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. डाऊन जलद आणि अर्ध जलद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.०५ ते ३.२२ दरम्यान सुटणाऱ्या लोकल नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतील. सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान डाऊन आणि अप जलद लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. मुंबईकडे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाडय़ा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे त्या २० मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे

कुठे – पनवेल ते वाशी अप आणि डाऊन

कधी – सकाळी ११.३० ते दुपारी ४.००

परिणाम – सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरकडे जाणारी, तर सकाळी ११.०६ ते दुपारी ४.०१ यावेळेत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे येणारी सर्व लोकलसेवा बंद असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी मार्गावर विशेष फे ऱ्या चालवल्या जातील. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ मार्गावरील वाहतूक सुरू असेल.

५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी दिवा जंक्शनपर्यंतच चालवली जाईल. ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी दिवा स्थानकातून रवाना होईल. दादर-रत्नागिरी गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दादर स्थानकातून दुपारी ३.४० वाजता सुटेल, ठाणे येथे ४.०६ वाजता, तर दिवा येथे ४.१३ वाजता पोहचेल.