पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक; मात्र रविवारी वाहतूक सुरू

मध्य रेल्वेवरील मस्जिद स्थानकातील नवीन पुलावर तीन गर्डर बसवण्यासाठी रविवारी सकाळी १०.३०पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा दोन्ही मार्गिकांवर आणि सीएसएमटी ते भायखळा दरम्यानच्या मंदगती मार्गिकेवर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येईल.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री ११.४५ पासून चार तांसाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा रोड ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान अप जलद आणि पाचव्या मार्गावर हा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेची वाहतूक रविवारी नेहमीप्रमाणे सुरू राहील, असे रेल्वेने कळवले आहे.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

  • कधी- रविवार, १६ डिसेंबर. स.१०.३० ते सायं.४.३०.
  • कुठे- सीएसएमटी आणि भायखळा दोन्ही मंदगती मार्ग, सीएसएमटी आणि वडाळा दोन्ही मार्गिका
  • परिणाम – सीएसएमटीहून कल्याणसाठी शेवटची लोकल सकाळी १०.४० वाजता, तर पनवेलसाठी सकाळी १०.१०ला सुटेल. सीएसएमटीकडे येणाऱ्या मंदगती मार्गावरील लोकल भायखळा स्थानकात सकाळी ९.५०ला आणि हार्बरवरील लोकल वडाळा स्थानकात सकाळी ९.५२ ला येईल. मस्जिद आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात लोकल थांबणार नाहीत. सीएसएमटी ते वडाळा दरम्यानची वाहतूक असेल. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान अप आणि डाऊन मंदगती मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. हार्बरवर वडाळा ते पनवेल आणि वांद्रे, गोरेगावसाठी दर १० ते १५ मिनिटांनी धावतील.

पश्चिम रेल्वे

  • कधी – शनिवार, १५ डिसेंबर. रात्री ११.४५ ते पहाटे ३.४५.
  • कुठे- माटुंगा रोड ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान अप जलद आणि पाचव्या मार्गावर
  • परिणाम- माटुंगा रोड ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते चर्चगेट दरम्यान अप मंदगती मार्गावर धावतील.