तर पश्चिम रेल्वेवर ‘नाईट ब्लॉक’
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान रविवारी (२२ मे) ‘नाईट ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे : मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.४५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत
परिणाम : मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यानची अप जलद मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावरुन चालविण्यात येईल.

हार्बर मार्ग
कुठे : कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यानची अप आणि डाउन या दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला अणि मानखुर्द ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष उपनगरी गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुख्य मार्गावरून आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे
कुठे : वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
कधी : रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत
परिणाम : अप आणि डाउन दोन्ही धिम्या मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान विरार-वसई रोड ते बोरीवली दरम्यानची अप आणि डाउन धिम्या मार्गावरील वाहतूकअप आणि डाउन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.