News Flash

मागच्या २४ तासात धारावीत करोनामुळे एकही मृत्यू नाही

धारावीत करोनाचे नवीन १८ रुग्ण

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील धारावीमधून आज एक थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून सातत्याने धारावीमध्ये रुग्ण सापडत आहेत. आजही धारावीमध्ये करोना व्हायरसचे १८ नवीन रुग्ण सापडले. पण मागच्या २४ तासात करोनामुळे धारावीत एकही मृत्यू झालेला नाही.

हीच त्यातल्या त्यात थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. धारावीमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या १६३९ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. मुंबईत करोना व्हायरसमुळे सर्वाधिक खराब स्थिती असलेल्या भागांमध्ये धारावीचा समावेश होतो. धारावी हा आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला भाग आहे.

मंगळवारी धारावीत करोना व्हायरसचे ३८ रुग्ण सापडले होते. धारावीत करोनामुळे आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीची लोकसंख्या ६.५० लाख आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 8:06 pm

Web Title: mumbais dharavi go up by 18 to 1639 dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जबरदस्त! सायन रुग्णालयातील एक महिन्याच्या बाळाची करोनावर मात
2 पालिका आयुक्तांच्या ‘दबंगगिरी’ने सारे अस्वस्थ!
3 VIDEO: इतिहास जिवंत ठेवणारी मुंबईतील राघववाडी
Just Now!
X