जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रिजच्या वतीने दिला जाणारा उद्योग रत्न पुरस्कार सुगी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक निशांत देशमुख यांना प्रदान करण्यात आला.
  चेंबरच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुंबईतील शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम) आयोजित केलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देशमख, माजी मुख्यमंत्री व चेंबरचे अध्यक्ष मनोहर जोशी, खासदार शिवाजीराव आढळराव आदी उपस्थित होते.
   देशमुख हे विविध उपक्रम परिचालक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील पुनर्विकास गटात कार्यरत सुगी ग्रुपची स्थापना त्याचे वडिल सुभाष देशमुख यांनी मुंंबईत १९८५ मध्ये केली. या उद्योगामार्फत देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली आहे.