‘हृदयस्पर्शी माधव बाग’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी विकास आमटे यांची खंत
आनंदवनात माल आहे पण दुकान नाही अशी परिस्थिती झाली असून येथील कुष्ठरोग्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत नाही, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे यांनी व्यक्त केली. शनिवारी सायंकाळी दादर येथे ‘ह्रदयस्पर्शी माधव बाग’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.
डॉ. रोहीत साने व किरण भिडे यांच्या अनुभवातून साकारण्यात आलेल्या ‘ह्रदयस्पर्शी माधव बाग’ पुस्तकाचे लेखन सुमेध वडावाला यांनी केले असून ग्रंथालीने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
व्यवसायिक स्वरूप आलेल्या रूग्णालयांमध्ये रूग्णांना हल्ली प्रेमाची वागणूक मिळत नाही. उलट येथे रूग्णांना लुटल्याची अनुभूती मिळते. अशा स्थितीत माधव बाग मध्ये मिळणारा अनुभव हा निश्चितच आगळा-वेगळा आहे. अशा ‘हृदयस्पर्शी’ कळपात येऊन आपल्याला आनंद झाला असल्याची भावना आमटे यांनी व्यक्त केली.
या पुस्तकाच्या निमित्ताने अॅलोपॅथी व आयुर्वेद या दोन उपचार पद्धतीेंमध्ये संवाद साधला जात आहे, असे ग्रंथालीचे धनंजय गांगल यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण डॉ. रामचंद्र लेले तर विशेष अतिथी म्हणून भारत सरकारच्या आयुष विभागाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी व आयुष विभागाचे महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ. कुलदिपराज कोहली उपस्थित होते. या वेळी अभिनेते लेखक दिलीप प्रभावळकर आणि चंद्रकांत मेहंदेळे यांनी पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे वाचन केले.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2016 रोजी प्रकाशित
‘कुष्ठरोग्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ नाही’
व्यवसायिक स्वरूप आलेल्या रूग्णालयांमध्ये रूग्णांना हल्ली प्रेमाची वागणूक मिळत नाही.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 29-05-2016 at 00:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No market for objects made by lepers