कूपनच्या पर्यायामुळे बँकांच्या रांगांमध्ये घट

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बँकांनी ग्राहकांच्या बोटाला शाई लावण्यास सुरुवात केली असली तरी ही शाई अद्याप पोस्टात पोहोचलेली नाही. शाई लावली जात नसल्याने सर्वसामान्यांबरोबरच मालक वा अन्य कुणासाठी म्हणून जुन्या नोटा बदलून घेणाऱ्यांच्याही पोस्टात उडय़ा पडत आहेत. त्यामुळे सध्या पोस्टातील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. अर्थात, त्यामुळे पोस्टाच्या तिजोरीतही चांगली भर पडत असून गेल्या आठवडाभरातील ठेव रक्कम जवळपास ९८० कोटींवर गेली आहे.

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मंगळवारी ग्राहकांच्या बोटाला शाई लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर बुधवारपासून प्रत्यक्ष शाई लावण्यास सुरुवात झाली. परंतु, ही सोय केवळ बँकेतच आहे. पोस्टात पाचशे-हजारांच्या जुन्या नोटा घेऊन येणाऱ्यांच्या बोटाला शाई लावण्यास अध्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे येथील गर्दी वाढते आहे, असे फोर्ट येथील जीपीओमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले. यासंबंधात पोस्टाचे अधिकारी एस.बी.व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हीही लवकरच शाई वापरण्यास सुरुवात करणार आहोत, असे सांगितले.

काही ठिकाणी बँका परिणामकारकपणे कूपन व्यवस्थेचा वापर करून ग्राहकांना दिलासा मिळवून देत आहेत. परिणामी काल बँकाबाहेरील रांगामध्ये घट झाल्याचे दिसत होते. परंतु काही बँकांबाहेर कूपन देऊनही नागरिकांध्ये वादावादी होताना दिसून आली. काही बँकांनी पसे भरण्यासाठी आणि जेष्ठ नागरिकांसाठी अशा वेगवेगळ्या रांगा केल्याने गर्दी असूनही बँकेचे व्यवहार सुरळीत होताना दिसले. कांदिवलीच्या बँक ऑफ महाराष्ट्राने टोकनबरोबरच ग्राहकांना बसण्यासाठी खुच्र्याचीही सोय उपलब्ध करून दिली होती.

note-ink-chart

स्टेट बँकेच्या शाखेत सकाळी ९ ते १० वेळेत फक्त दीडशे कूपन वाटले जातात. त्यानुसार नागरिकांना त्यांचा नंबर केव्हा येईल, हे आधीच सांगितले जाते. गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा हा पर्याय बँकेने अवलंबल्यामुळे तासन् तास रांगेत उभे राहण्याच्या कटकटीपासून इथल्या नागरिकांची सुटका झाली असून दिवसभरातील उर्वरीत वेळेचे इतर कामांसाठी नीट नियोजन करणे त्यांना शक्य झाले आहे. ठाणे जनता सहकारी बँकेनेही योग्य रितीने व्यवस्थापन केल्याचे दिसून आले. अगदी कूपन नंबर ३०० असूनही तासाभरात मला पसे मिळाले, या शब्दात रिचा कोडगे हिने कौतुक केले.

याच्या नेमके उलट चित्र याच भागातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिसून आले. दुपारच्या
जेवणाच्या सुट्टीत बँकेचे व्यवहार बंद होतात. यावेळेत कूपन असल्याने काही नागरिक घरी गेले होते. मात्र कूपन घेऊन रांगेत थांबलेल्या लोकांनी घरी गेलेल्या लोकांना परत रांगेत घेण्यास नकार दिला. त्यामुळे कूपन देऊनही या ठिकाणी नागरिकांची वादावादी होताना दिसून आली. ‘सकाळी नऊपासून मी कूपनसाठी रांगेत उभा‘एमएमआरडीए’ पुढे पालिकेचे नमते होतो. परंतु जेवायला घरी गेल्यामुळे माझा कूपन नंबर जवळ आला तरी मला रांगेत शेवटी जावं लागतयं. रांगेतच उभं राहायचं तर मग कूपन वाटण्याचा काय फायदा,’ अशी प्रतिक्रिया मुकेश जाधव यांनी दिली. या भागातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेने कूपन व्यवस्था सुरु न केल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत. गेले तीन दिवस कामावरुन बँकेच्या कामासाठी लवकर निघतेय. पण इथली रांग संपतच नाही. इतर बँकांप्रमाणे या ही बँकेने कूपन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी दिप्ती खंडेलवाल यांनी केली आहे.