संघाविरोधात ट्विट केल्यानंतर संघाने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजर झाले. त्यावेळी राहुल गांधी यांनी मी दोषी नाही असे वक्तव्य केले. कोर्टाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे.

RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजेरी लावली. राहुल गांधी जेव्हा मुंबईत दाखल झाले तेव्हा विमानतळावरच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. कृपाशंकर सिंह, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरूपम यांचीही मुंबई विमानतळाबाहेर हजेरी होती. ‘राहुल तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा मुंबई विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.

काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोडल्यापासून राहुल गांधी पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. ते सध्या शिवडी कोर्टात हजर झाले आहेत. पत्रकार आणि विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात संघाचा सहभाग होता असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. ज्यानंतर काँग्रेसने त्यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली.याच प्रकरणाची सुनावणी असल्याने राहुल गांधी हे मुंबईतल्या शिवडी कोर्टात दाखल झाले आहेत. या प्रकरणी सीपीएम नेते सीताराम येचुरी यांच्याविरोधातही कोर्टाने समन्स जारी केलं आहे.

५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. ज्यानंतर आरोपांच्या फैरीच झडताना दिसल्या. याचवेळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. गौरी लंकेश यांच्या हत्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसणीचा हात आहे या आशयाचं एक ट्विट राहुल गांधींनी केलं होतं. या ट्विटमुळेच त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा संघाने केला. आता काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.