27 February 2021

News Flash

अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

घाबरलेल्या तरुणीने मोबाइल फोन काढून त्याच्या या कृत्याचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मालाड परिसरात महिलेसमोर अश्लील वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ने अटक केली आहे. मोहम्मद शकील अब्दुल कादर (३२) असे आरोपीचे नाव असून तो मालवणी मालाड येथील रहिवासी आहे.

पीडित तरुणी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतत असताना १ सप्टेंबरला रात्री ११.३० च्या सुमारास मालाड येथील चिंचोली बंदर बस थांब्याजवळ बसची वाट पाहत उभी होती. या वेळी तेथून जाणारा रिक्षाचालक मोहम्मद तरुणीजवळ आला आणि रिक्षात बस तुला सोडतो असे तिला म्हणू लागला. त्या वेळी तिने रिक्षाचालकाकडे बघितले असता, त्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केल्याचे तरुणीला दिसले. तसेच तो विकृत पद्धतीने हावभाव करून तिच्याकडे पाहायला लागला. या अनपेक्षित प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने मोबाइल फोन काढून त्याच्या या कृत्याचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भयभीत झालेल्या मोहम्मदने तेथून पळ काढला. मात्र घडल्या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने फोन करून आईला हा प्रकार सांगितला आणि मदतीसाठी तिला बोलावून घेतले. पीडित तरुणीची आई घटनास्थळी येऊन तिने तरुणीसह बांगुरनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.

सापळा रचून पोलिसांनी मोहम्मदला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली. मोहम्मदविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांत विनयभंग आणि हाणामारीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 4:40 am

Web Title: rickshaw driver arrested for committing indecent behavior zws 70
Next Stories
1 आचारसंहितेआधी रेल्वे प्रकल्पांची लगबग
2 ‘विमानतळाच्या धावपट्टीवर माथेफिरू पोहोचलाच कसा?’
3 अतिक्रमित झोपडपट्टीधारकांना जमिनीचे पट्टे
Just Now!
X