मुक्त शब्द मासिक, शब्द पब्लिकेशन आणि शब्द द बुक गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारीपासून ‘शब्द गप्पा’ सुरु होत आहेत. पहिल्या दिवशी घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. चैत्रा रेडकर व अमृता मोरे ही मुलाखत घेणार आहेत.
या शब्दगप्पा ११ डिसेंबपर्यंत चालणार असून ३ जानेवारी रोजी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, ५ जानेवारी रोजी बैठकीची लावणी सादर करणाऱ्या कलावंत गुलाबबाई संगमनेरकर, ७ जानेवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ६ जानेवारी रोजी गझल गायिका शुभा जोशी यांची प्रकट मुलाखत, ‘सत्ता बदलली, धोरणांचे काय’, ‘नाटक-कालचे आणि आजचे’, ‘संघाचा अजेंडा देशाचा इतिहास आणि संस्कृती बदलणार का’ हे परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत.शब्दगप्पा चे कार्यक्रम चिंतामणी ट्रस्ट, शिंपोली दूरध्वनी केंद्राजवळ, लिंक रोड, बोरिवली (पश्चिम) येथे रात्री ७.१५ ते ९.३० या वेळेत होणार आहेत.