मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेला तपास चुकीचा असल्याचा दावा करत या प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला आरोपमुक्त करण्याच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) निर्णयावर विशेष न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिला जामीन देण्यास नकार दिला होता. त्या विरोधात साध्वी प्रज्ञा सिंह हिने आता उच्च न्यायालयात धाव घेत जामिनाची मागणी केली आहे.

प्रज्ञा सिंह हिचा या स्फोटाच्या कटाशी काहीही संबंध नव्हता हे प्रथमदर्शनी तरी स्पष्ट होत नाही. उलट तिच्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे सकृतदर्शनी खरे असल्याचेही विशेष न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केले होते. बॉम्बस्फोटप्रकरणी पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा ‘एनआयए’ने दिल्यानंतर प्रज्ञा सिंह हिने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तिला जामीन देण्यासही विरोध नसल्याची भूमिका ‘एनआयए’ने घेतली होती.