दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तिच्या शाळेच्याच एका सुरक्षारक्षकाने लैंगिक अत्याचार केला. अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी शाळेचा सुरक्षारक्षक मुकेश मिश्रा (३७) याला अटक केली आहे.
पीडित मुलगी बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर क्लाससाठी जात असताना मुकेश मिश्रा याने तिला बोलतबोलत आपल्या केबिनमध्ये आणले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर मिश्राने तिला सोडले. घरी आल्यावर मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी पालकांनी तक्रार दिल्यानंतर अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी मुकेश मिश्रा याला बाललैंगिक शोषण कायद्याअंतर्गत (पोक्सो) अटक केली.