News Flash

विकृती! सापाच्या डोक्यात घातला वापरलेला कंडोम, मुंबईतील घटना

समोरचे दुश्य पाहून मला धक्का बसला.

मुंबईत कांदिवली पूर्वेला शनिवारी एक साप आढळला. या सापाचा जगण्यासाठी संघर्ष सुरु होता. कारण अज्ञात व्यक्तीने या सापाच्या डोक्यात वापरलेला कंडोम घातला होता. चेहरा कंडोमने झाकला गेल्यामुळे त्या सापाची श्वासोश्वास करण्यासाठी धडपड सुरु होती. त्या अवस्थेतून सापाची सुटका केल्यानंतर लगेच त्याला पशूवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले.

नेमकं काय घडलं ?
शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ग्रीन मीडोस हाऊसिंग सोसायटी जवळ हा साप आढळला. श्वासोश्वास करण्यासाठी त्या सापाची धडपड सुरु होती. एका स्थानिक रहिवाशाने मदतीसाठी मिता मालवणकर या महिला सर्पमित्राला घटनास्थळी बोलवले. मिता लगेच त्या ठिकाणी पोहोचल्या.

“स्थानिक रहिवाशी वैशाली तानहा यांचा मला फोन आला. एक साप विचित्र पद्धतीने सरपटत असून त्याच्या डोक्याभोवती प्लास्टिक बॅग गुंडाळलेली असल्याचे त्यांनी सांगितले. मी तिथे पोहोचले, तेव्हा समोरचे दुश्य पाहून मला धक्का बसला. कारण कोणीतरी घाणेरडा, वापरलेला कंडोम सापाच्या चेहऱ्याभोवती गुंडाळलेला होता” असे मिता मालवणकर यांनी सांगितले. मिता यांनी पद्धतशीरपणे त्या अवस्थेतून सापाची सुटका केली. सर्प पकडण्यामध्ये प्रशिक्षित असलेल्या व्यक्तीने किंवा तज्ज्ञाने हे क्रूर कृत्य केल्याचा संशय मिता त्यांनी व्यक्त केला. कारण सापाच्या चेहऱ्याभोवती कंडोम गुंडाळणे इतके सोपे नाही. त्यांचा दंश खूप वेदनादायी ठरु शकतो. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- मुंबई गोळीबाराने हादरली; मालाडमध्ये तरुणीच्या हत्येने खळबळ

सुटका केल्यानंतर काय केले?
सापाची सुटका केल्यानंतर, मिता त्या सापाला बोरिवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये घेऊन गेल्या. डॉ. शैलेश पेठे या पशूवैद्यकीय अधिकाऱ्याने सापाची तपासणी केली. उपचारानंतर त्या सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी पुन्हा सोडून देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 1:06 pm

Web Title: snake struggles to breathe after person puts used condom over its head in mumbai dmp 82
Next Stories
1 ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची तयारी
2 मुंबई गोळीबाराने हादरली; मालाडमध्ये तरुणीच्या हत्येने खळबळ
3 नवी मुंबई : उघड्यावर लघुशंका करण्यावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या
Just Now!
X