गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण सुरू झाल्या झाल्या पहिल्याच मिनिटात फुल्ल झाल्यामुळे आता घरच्या गणपतीला पोहोचायचे कसे, या चिंतेत असलेल्या मुंबईकर चाकरमान्यांची चिंता रेल्वे आणि एसटीने काही प्रमाणात मिटवली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे कोकण रेल्वेमार्गावर यंदा ११६ गणेशोत्सव विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत. तर मुंबई, ठाणे आणि पालघर या आगारांतून २४ ते २८ ऑगस्ट या काळात अतिरिक्त १८९५ एसटी बसगाडय़ा कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत. यापैकी काही बसगाडय़ा सामूहिक आरक्षणाच्या आहेत.
* आरक्षित विशेष गाडी (२६ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान २८ फेऱ्या)
मुंबई-मडगाव (गुरुवार वगळता सर्व दिवस)
सीएसटीहून सुटण्याची वेळ – रात्री १२.२० वा.
मडगावला पोहोचण्याची वेळ – दुपारी २.१० वा.
मडगाव-मुंबई (गुरुवार वगळता सर्व दिवस)
मडगावहून सुटण्याची वेळ – दुपारी २.४० वा. सीएसटीला पोहोचण्याची वेळ – दुसऱ्या दिवशी     सकाळी ०४.३५ वा.
* आरक्षित विशेष गाडी (२५ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान एकूण सहा फेऱ्या)
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी मुंबईहून सुटण्याची वेळ – दुपारी १.०० वा.
करमाळी येथे पोहोचण्याची वेळ – रात्री १.४० वा.
०१०४० अप करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस (२६ ऑगस्ट, २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर)
करमाळीहून सुटण्याची वेळ – सकाळी १०.०० वा.
मुंबईला पोहोचण्याची वेळ – रात्री ११.१५ वा.
* आठवडय़ातून दोनदा आरक्षित विशेष गाडी (२६ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान एकूण १० फेऱ्या)
मुंबई-करमाळी (२६ ऑगस्ट, ३० ऑगस्ट, २ सप्टेंबर, ६ सप्टेंबर, ८ सप्टेंबर)
मुंबईहून सुटण्याची वेळ – दुपारी १२.५० वा.
करमाळीला पोहोचण्याची वेळ – रात्री ०१.४० वा.
करमाळी-मुंबई (२७ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, ३ सप्टेंबर, ७ सप्टेंबर, १० सप्टेंबर)
करमाळीहून सुटण्याची वेळ – सकाळी १०.०० वा.
मुंबईला पोहोचण्याची वेळ – रात्री ११.२०
*आठवडय़ातून एकदा आरक्षित गाडी (२८ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान एकूण ६ फेऱ्या)
लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी (२८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर)
मुंबईहून सुटण्याची वेळ – दुपारी १.०० वा.
करमाळीला पोहोचण्याची वेळ – रात्री १.४० वा.
करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस (२९ ऑगस्ट, ५ सप्टेंबर, १२ सप्टेंबर)
करमाळीहून सुटण्याची वेळ – सकाळी १०.०० वा.
मुंबईला पोहोचण्याची वेळ – रात्री ११.१५ वा.
*अनारक्षित विशेष गाडी (२० फेऱ्या)
लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी (२३, २५, २७, २९, ३१ ऑगस्ट, २, ५, ७, ९, १२ सप्टेंबर)
मुंबईहून सुटण्याची वेळ – रात्री १.०० वा.
रत्नागिरीला पोहोचण्याची वेळ – सकाळी ०९.०५ वा.

एसटीच्या १८९५ गाडय़ा
मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागांतील विविध आगारांमधून एसटीच्या १८९५ जादा गाडय़ा कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान एसटीने चालवलेल्या जादा गाडय़ांची संख्या १७४१ होती. यंदा या गाडय़ा मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, उरण, ठाणे, ठाणे खोपट आगार, विठ्ठलवाडी, कल्याण, वसई, अर्नाळा आणि नालासोपारा या आगारांतून सुटणार आहेत.
एसटीच्या १८९५ जादा गाडय़ांपैकी १२८५ गाडय़ा या सामुहिक आरक्षणातील आहेत. तर उर्वरित ६१० गाडय़ा या नियमित आरक्षणाने सुटणार आहेत. या ६१० गाडय़ांपैकी मुंबई विभागातून २६९, ठाणे विभागातून ३३० आणि पालघर विभागातून ११ गाडय़ा असतील. तर सामूहिक आरक्षणात मुंबई विभागातून ७९०, ठाणे विभागातून ४१८ आणि पालघर विभागातून ७७ गाडय़ांचे आरक्षण झाले आहे. त्याशिवाय मागणी आणि निकड असल्यास एसटी आयत्या वेळीही जादा गाडय़ा सोडणार असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.