राज्यात एसटीच्या जिल्हांतर्गत प्रवासात शारीरिक अंतर  राखण्याच्या नियमांचे पालनच होत नसल्याचे समोर आले आहे.  मुंबई महानगर परिसरातही अत्यावश्यक कर्मचारी व खासगी कार्यालयाच्या  कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या एसटी सेवेत हे नियम पाळले जात नसतानाही त्याकडे मात्र महामंडळाने साफ दुर्लक्षच केले आहे.

नाशिक, मालेगाव, मनमाड,सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरीसह अन्य आगारांना महामंडळाने पत्र पाठवून पोलिसांमार्फत कोणतीही कारवाई होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. काही फेऱ्यांचे भारमान हे ६० टक्के , ९२ टक्के , ६२ टक्के  आणि ८७ टक्के  आढळल्यानंतर एसटी महामंडळाने त्याची दखल घेऊन आगारप्रमुखांना पत्र पाठविले आहे. परंतु गेल्या चार महिन्यांत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी एसटी सुरू आहे. कालांतराने ही सेवा अन्य प्रवाशांसाठीही खुली करण्यात आली.  कल्याण, डोंबिवली,बदलापूर, पनवेल अन्य भागातून एसटीने ठाण्यापर्यंत येताना किंवा मुंबईच्या दिशेने जाताना मोठी गर्दी असते.