सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आता एनसीबीने म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जया शाह आणि श्रुती मोदी या दोघींनाही उद्याच्या चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात या दोघींची उद्या चौकशी होणार आहे. या दोघींना उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. या चौकशीतून काय काय गोष्टी समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली होती. वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी त्याने आत्महत्या केली.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने आत्महत्या केली की तो घराणेशाही आणि कंपूशाहीचा बळी ठरला अशी एक चर्चा सुरु झाली. ज्यानंतर हे सगळं प्रकरण सीबीआयकडेही सोपवलं गेलं. दरम्यान या प्रकरणात वेगवेगळे ट्विट्स अँड टर्न्सही आले. एनसीबीने ९ सप्टेंबरला या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीलाही अटक केली आहे.  दरम्यान आता सुशांतच्या दोन्ही मॅनेजर्सची चौकशी एनसीबीतर्फे केली जाणार आहे.