News Flash

पुन्हा एकदा स्वाइन फ्लू

वर्षभरात प्रभाव ओसरलेल्या स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. प्रयोगशाळेत येणाऱ्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये स्वाइन फ्लू आढळण्याचे प्रमाण वाढले आहे

| August 12, 2013 02:23 am

वर्षभरात प्रभाव ओसरलेल्या स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. प्रयोगशाळेत येणाऱ्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये स्वाइन फ्लू आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तीन दिवस ताप राहणाऱ्या जास्तीत जास्त रुग्णांची स्वाइन फ्लूसाठी चाचणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
गेल्या आठवडय़ात बदलापूर येथील महिलेचा शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. रुग्णालयात येण्यापूर्वीच तिची तब्येत बिघडली होती. स्थानिक डॉक्टरांनी केलेल्या तपासणीतच तिला स्वाइन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले असते तर तिचे प्राण वाचले असते. पावसामुळे वातावरण थंड झाल्याने स्वाइन फ्लूच्या एचवनएनवन विषाणूचा प्रभाव वाढला आहे. मुंबईत स्वाइन फ्लूचा फारसा प्रभाव अजूनही दिसत नसला तरी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी येत असलेल्या नमुन्यांमध्ये स्वाइन फ्लूचे विषाणू सापडण्याचे प्रमाण जुलैमध्ये १५ टक्क्य़ांवर गेले आहे. जूनमध्ये हेच प्रमाण अवघा १.१ टक्का होते. गेल्या वर्षी जूनमध्ये हे प्रमाण चार टक्के तर जुलैमध्ये आठ टक्के होते.
‘स्वाइन फ्लूचा एचवनएनवन हा विषाणू परदेशातून आला तेव्हा त्याला रोखण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र आता चार वर्षांनंतर हा विषाणू वातावरणात स्थिरावला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्याला प्रतिबंध घालता येणार नाही. त्याचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात वातावरण थंड झाले की त्याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते,’ अशी माहिती ्नराज्य आरोग्य सेवेचे सहआयुक्त डॉ. व्ही. डी. खानंदे यांनी दिली. स्थानिक डॉक्टरांकडील औषधानेही ताप दोन दिवसात उतरला नाही तर स्वाइनफ्लूची शक्यता असू शकते. सहा-सात दिवसांनी तब्येत खालावल्यानंतर उपचार करणे कठीण जाते, असे त्यांनी सांगितले.

मुंबईला धोका नाही
स्वाइन फ्लू आजार पसरवणाऱ्या एचवनएनवन या विषाणूची वाढ कोरडय़ा आणि थंड वातावरणात होते. मुंबईची दमट व तुलनेने गरम हवा यात स्वाइन फ्लूचे विषाणू फारसे तग धरू शकत नाहीत त्यामुळे या आजाराचा संसर्ग मुंबईत फारसा वाढण्याची शक्यता नाही. मात्र महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने खबरदारीचा उपाय म्हणून संसर्गजन्य आजारांमध्ये स्वाइन फ्लूबाबतही डॉक्टरांना कल्पना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 2:23 am

Web Title: swine flu again not scared to mumbai
टॅग : Swine Flu
Next Stories
1 डॉक्टर आहेत, पण नियुक्त्याच नाहीत!
2 राष्ट्रवादीकडील गृह खात्यानेच ‘त्या’ तरुणांना पकडले होते!
3 सेनेच्या जागांवर रिपाइंचा डोळा
Just Now!
X