News Flash

रेल्वे हद्दीत तांब्याच्या तारांची चोरी पाच जणांना अटक

ओव्हरहेड वायरला आधार देणाऱ्या तांब्यांच्या तारांची (अँटीक्रि प वायर) चोरी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई : ओव्हरहेड वायरला आधार देणाऱ्या तांब्यांच्या तारांची (अँटीक्रि प वायर) चोरी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे उघडकीस आले आहे. ही चोरी करणाऱ्या पाच जणांच्या एका टोळीला मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून अटक करण्यात आली. या तारांची चोरी के ल्याने ओव्हरहेड वायरला विद्युतपुरवठा होण्यात अडथळे होऊन लोकल विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीची ४० मीटरची तार हस्तगत करण्यात आली. तर रेल्वे हद्दीत ओव्हरहेड वायर व सिग्नलसाठी वापरल्या अँटीक्रिप वायरची या टोळीने मोठय़ा प्रमाणात चोरी करून गुजरात येथे विकल्या आहेत.

रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या ओव्हरहेड वायरला आधार म्हणून बाजूलाच एक तांब्याची तार असते. तांब्याची तार ओव्हरहेड वायरलाच बांधून ठेवलेली असते. ही वायर काढली तर ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा कमी होतो व तांत्रिक समस्या उद्भवू शकते. याच तारांची चोरी करण्याच्या घटना मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर घडत होत्या. रेल्वे सुरक्षा दलाकडून पकडण्यात आलेले चार आरोपी तारा चोरण्याचे काम २०१९ पासून करत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. एका मोठय़ा बांबूला ब्लेड लावून आणि हातात रबर ग्लोव्हज घालून ओव्हरहेड वायरला आधार असणारी तांब्याची तार कापण्याची पद्धत या चोरांनी अवलंबली होती. बाजूनेच जाणाऱ्या ओव्हरहेड वायरमधून विजेचा पुरवठा होत असतानाही धोका पत्करून चोरी करत होते. लोकलच्या दरवाजाजवळच उभे राहून अशा प्रकारे चोरी करताना प्रवाशांना संशय येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रुळांजवळ कामे सुरू असलेल्या ठिकाणी उभे राहून चोरी करण्याचे तंत्र अवलंबवले. त्यांना पनवेल रेल्वे सुरक्षा दलाकडून अटक करण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. हे आरोपी उत्तर प्रदेशमधील आहेत.

यापूर्वीही २०१९ मध्ये अशाप्रकारे चोरी करताना या चोरांना ताब्यात घेण्यात आले होते, परंतु त्यावेळी पलायन के ले होते. ७५ मीटर लांब तारांची चोरी या आरोपींनी के ली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 2:17 am

Web Title: theft of copper wires at railway boundaries ssh 93
Next Stories
1 मुंबईतील चौपाटय़ांवर कचऱ्याचे ढीग
2 वादळी पावसात रस्त्यांची दैना
3 ब्रिटिशकालीन उड्डाणपुलांच्या कामांची संथगती
Just Now!
X