19 October 2020

News Flash

‘सीएसएम’टी स्थानकात जखमी प्रवासी मदतीविना

वाशी लोकलच्या मालडब्यावरच ३० वर्षीय राहुल गौतम या प्रवाशाला ओव्हरहेड वायरचा जबर शॉक लागला.

सीएसएमटी स्थानक

मुंबई : ओव्हरहेड वायरचा शॉक लागलेला ३० वर्षीय जखमी प्रवासी २० मिनिटे सीएसएमटी स्थानकातच विव्हळत राहिल्याची घटना मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली.

त्याला जवळच असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्याऐवजी पोलीस घटनेचे चित्रीकरण करण्यात मग्न राहिले. स्थानकाबाहेर असणारी रुग्णवाहिकाही चालकच नसल्याने कुचकामी ठरली. अखेर प्रवाशांच्या मदतीने जखमीला सेन्ट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या वाशी लोकलच्या मालडब्यावरच ३० वर्षीय राहुल गौतम या प्रवाशाला ओव्हरहेड वायरचा जबर शॉक लागला. कोणतीही हालचाल होत नसल्याने त्याचा मृत्यू झाला की काय, असे अनेकांना वाटले. मात्र, त्याच्या हातांची हालचाल दिसली. मदत करण्यासाठी रेल्वेचा एकही व्यक्ती पुढे येत नसल्याने अखेर प्रवाशांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

३० वर्षीय राहुल गौतम हा कोपरखैरणे येथे राहतो. त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि तो बोलण्याच्या मन:स्थितीत नाही, असे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे लोकलच्या टपावर चढून ओव्हरहेड वायरचा शॉक कसा लागला हे त्याच्या जबाबातूनच उघड होईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. हा प्रवासी सीएसएमटी स्थानकात आलेल्या लोकलच्या टपावरूनच येत होता, असा अंदाज आहे.

सीएसएमटी स्थानकात ओव्हरहेड वायरचा प्रवाशाला शॉक लागताच त्वरित वायरला होणारा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रवाशांनी लोकलच्या टपावर चढून प्रवास करू  नये, असे आवाहन केले जाते. 

ए.के.जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 1:01 am

Web Title: wounded passengers at csmt station did not get help
Next Stories
1 आमदार रमेश कदम यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास मान्यता
2 खर्च परवडत नाही! २०२३ पासून डबलडेकर पूर्णपणे बंद
3 आता अजित पवारांना तेवढंच काम उरलंय; मुख्यमंत्री फडणवीसांची टीका
Just Now!
X