जी २० शिखर परिषदेच्या तयारीसाठी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर रस्त्यांची डागडुजी केली त्याला तब्बल १० कोटींचा खर्च आला आहे. सांताक्रूझ परिसरापासून विमानतळाकडे जाणाऱ्या पाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी हा खर्च करण्यात आला आहे. या खर्चाला प्रशासकांनी कार्योत्तर मंजुरी दिली.

हेही वाचा >>>मुंबई : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

जी-२० शिखर परिषदेच्या विकास कार्यगटाची पहिली चार दिवसीय बैठक डिसेंबर महिन्यात मुंबईत झाली. या परिषदेला उपस्थित राहणाऱ्या परदेशातील सदस्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील रस्ते अवघ्या काही दिवसात सजले होते. या परिषदेच्या तयारीसाठी पालिकेने अगदी सर्व शक्ती पणाला लावली होती. या बैठकांसाठी १९ देश व युरोपियन युनियनचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेच्या १४ बैठका महाराष्ट्रात होणार आहेत. त्यामुळे विमानतळ परिसरातील रस्त्यांनी कधी नव्हे ते कात टाकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>>मुंबई: मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडप्रकरणी उद्यापासून सुनावणी

मुंबई महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या आसपासच्या रस्त्याचे तातडीने सपाटीकरण केले. तातडीने कार्यादेश देऊन महिन्याभरात काम पूर्ण केले.छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या प्रवेशद्वार क्रमांक ८ पासून पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंतच्या रस्त्याचे पुनःपृष्टीकरण करण्यात आले होते. तसेच मिलिटरी कॅम्प मार्ग, सीएसटी मार्ग या मार्गांचेही सपाटीकरण करण्यात आले होते.