मुंबई : मध्य रेल्वेवरील दररोज शेकडो लोकलसह रेल्वेगाडयांचा खोळंबा होतो. यासाठी अनेक कारणे असली, तरी प्रवासी गाडीतील आपत्कालीन साखळी खेचत असल्याने रेल्वेगाडय़ा उशिरा धावत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. नोव्हेंबर २०२३ मध्ये आपत्कालीन साखळी खेचल्याने, १९७ रेल्वेगाडया विलंबाने धावल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> दादर स्थानकातील फलाट क्रमांकांत बदल; आजपासून अंमलबजावणी

Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

अत्यावश्यक कारणांसाठी किंवा आपत्कालीन घटनेवेळी उपनगरीय आणि मेल, एक्स्प्रेसमध्ये आपत्कालीन साखळी  सुविधा देण्यात आली आहे. मात्र, प्रवासी अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी आपत्कालीन साखळी ओढतात. यामुळे लोकल, मेल, एक्स्प्रेसचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या वर्षांत मध्य रेल्वेने एकूण ७९३ व्यक्तींविरुद्ध विनाकारण संकटकालीन साखळीच्या गैरवापराचे गुन्हे नोंदवले. त्यातून तब्बल २.७२ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवर, विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे,  १,०७५ रेल्वेगाडया उशिराने धावल्या. त्यात मुंबई विभागातील ३४४ रेल्वेगाडया, भुसावळ विभागात ३५५ रेल्वेगाडय़ा, नागपूर विभागात २४१ रेल्वेगाडय़ा, पुणे विभागात ९६ रेल्वेगाडय़ा विभाग आणि सोलापूर विभागात ३९ रेल्वेगाडया होत्या. त्यात नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेवर साखळी खेचण्याच्या घटनांमुळे   १९७ गाडय़ा उशिराने धावल्या. रेल्वेगाडय़ांचा सरासरी वक्तशीरपणा १० मिनिटांनी कमी झाला. त्यातील मुंबई विभागात ७३, भुसावळ विभागात ५३, नागपूर विभागात ३४, पुणे ३० आणि सोलापूर  ८ गाडय़ा होत्या. मुंबई उपनगरीय रेल्वेतील संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे दररोज १२ लोकल उशिरा धावतात, अशी माहिती देण्यात आली.