२०१५मधील इत्थंभूत घडामोडींची नोंद
आयसिसच्या दहशतवादाने हादरून गेलेले जग, मध्यपूर्वेतील राष्ट्रांमधील खदखद, अमेरिकेत निवडणुकीआधी सुरू असलेली राजकीय चुळबुळ, पॅरिसमधील हवामान परिषदेतील पर्यावरणीय गणिते यांनी २०१५ साल गाजले. या आंतरराष्ट्रीय घडामोडींइतकेच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संपूर्ण वर्षभरातील घटनाऐवज एकत्रित करणारे ‘लोकसत्ता’चे लोकप्रिय पुस्तक ‘वर्षवेध’ बाजारात दाखल झाले आहे. २०१५ सालातील अचूक नोंदींसोबत भरगच्च माहिती आणि संपादकीय टिपणे हे यंदाच्या अंकाचे वैशिष्टय़ आहे.
लेखक, पत्रकार, विश्लेषक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि माहिती संग्राहकांसाठी गेल्या तीन वर्षांपासून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून ‘वर्षवेध’ पुस्तकाचा उपक्रम राबविला जात आहे. पहिल्या वर्षांपासूनच प्रचंड प्रतिसादामुळे या पुस्तकाचे प्रकाशनानंतर अनेक वेळा पुनर्मुद्रण केले जाते. २०१५मध्ये घडलेल्या प्रत्येक महत्त्वपूर्ण गोष्टीची इत्थंभूत खबरबात या पुस्तकामध्ये आहे.
भारताच्या लष्करावर दृष्टिक्षेप, क्रीडा-विश्वातील ठळक नोंदी, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिघात घडलेले २०१५चे संपूर्ण वर्ष या निमित्ताने पुस्तकाच्या पानामध्ये एकवटले आहे. २०० पानांच्या या घटनानोंदींच्या संग्रहाची किंमत १०० रुपये आहे.
सर्वासाठी उपयुक्त कसा?
हा वार्षिक अंक सर्वासाठीच उपयुक्त माहितीचा स्रोत आहे. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांतील उमेदवार, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, सामान्यज्ञानाच्या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक यांच्यासाठी हा अंक म्हणजे २०१५ सालातील प्रमुख घडामोडींचा संग्रह ठरणार आहे.
ठळक वैशिष्टय़े
* २०१५ तील घडामोडींच्या तारीखनिहाय नोंदी
* महत्त्वाची सांख्यिकी माहिती. संपादकीय टिपणांचा नवा माहिती ऐवज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टायटल पार्टनर : पितांबरी, असोसिएट पार्टनर : परिवार चहा, बँकिंग पार्टनर : ठाणे जनता सहकारी बँक, पॉवर्ड बाय : केसरी, आयुशक्ती, रिजन्सी ग्रुप, चाणक्य मंडळ.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2015 all updates in loksatta varsh vedh
First published on: 23-01-2016 at 01:10 IST