आज आणि उद्या प्रवेश निश्चित करता येणार

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली. दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या १ लाख २४ हजार ७१५ जागांसाठी एकूण ३७ हजार ४७९ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी २८ हजार ६७७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर १८ हजार ४५६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, ४ हजार ९१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि २ हजार १४१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

हेही वाचा >>> मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत ‘इतका’ पाणीसाठा ; पाणीकपात रद्द होण्याची शक्यता

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

तिसऱ्या प्रवेश यादीच्या तुलनेत पहिल्या विशेष प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ५ ते १० टक्क्यांनी मोठी घट झाली होती. त्यामुळे दुसऱ्या विशेष प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किती प्रमाणात घट होत आहे, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मुंबई महानगरातील महविद्यालयातील दुसऱ्या विशेष प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांचे स्वरुप संमिश्र पाहायला मिळत आहे. दुसऱ्या विशेष प्रवेश यादीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये अवघ्या २ ते ३  टक्क्यांनी घट झाली आहे. तर काही महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये पहिल्या विशेष प्रवेश यादीच्या तुलनेत ४  ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुन्हा तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गाची भीषण अवस्था! युट्युबर जीवन कदमने दाखवलं सत्य, म्हणाला, “गाडीचा टायर भररस्त्यात…”

विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले की नाही, हे पाहता येईल. सदर दुसऱ्या विशेष प्रवेश यादीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार, ४ ऑगस्ट ते शनिवार, ५ ऑगस्ट या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास सहमती असल्यास विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करून घ्यावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या कालावधीत आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश फेरीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.