मुंबई : गोवंडी येथील शिवाजी नगर जंक्शन जवळ बेस्ट बसच्या अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बेस्ट बस शिवाजी नगर येथून कुर्ल्याच्या दिशेने जात असताना दुचाकीस्वार बसच्या मागच्या बाजूला धडाकला. त्यानंतर चालकाला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेल्यात आले तेथे दाखल कारण्यापूर्वीच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा >>> अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला देण्याची भीती घालून ३७ लाखांची खंडणी, तीन महिलांविरोधात गुन्हा

दीक्षित विनोद राजपूत(२५) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शिवाजी नगर जंक्शन येथील महामार्गावर शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. त्यात बेस्ट बस चालक विनोद आबाजी रणखांबे बस क्रमांक ३७५ शिवाजी नगर येथून कुर्ल्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी दुचाकी बसच्या मागच्या बाजूला धडकाली. त्यात मागच्या चाकाच्या संपर्कात आल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. बस भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवुन पाठीमागुन धडक केल्याप्रकरणी बस चालक विनोद रणखांबे यांच्याविरोधात देवनार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(ब),२८१(ब) व मोटर वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> अश्लील चाळे करणाऱ्याला आग्रा येथून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्ष्मी राजपूत यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झाल्याची आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी कुर्ला येथे इलेक्ट्रीक बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता, तर ४२ जण जखमी झाले होते. तसेच बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली येऊन बुधवारी ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होेता. त्या व्यक्तीला एका दुचाकीस्वाराने धडक दिली होती. त्यामुळे तो बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी आरोपी दुचास्वाराला अटक केली होती. त्यानंतर आता शनिवारी रात्री उशीरा शिवाजी नगरला हा तिसरा अपघात घडला.