लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: महारेराच्या वसुली आदेशानुसार २० एप्रिल रोजी पनवेल परिसरातील मोरबी ग्रामपंचायतीत एन. के. गार्डनचे भूपेश बाबू यांच्या मालमत्तांचा यशस्वीपणे लिलाव करण्यात आला होता. या लिलावातून ४.७८ कोटी रुपये मिळाले असून ३४ तक्रारदारांना नुकतीच ही रक्कम अदा करण्यात आली. अदा करण्यात आलेल्या रकमेत ३१ लाख ५७ हजार रुपये इतकी सर्वाधिक वसुली असून सर्वात कमी ३ लाख ४८ हजार रुपये इतकी रक्कम आहे. दरम्यान वसुली रक्कमेसह ३४ पैकी ३० तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून एकूण सहा लाख रुपयेही अदा करण्यात आले आहेत.

आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने स्वतः महारेरा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून वसुली आदेशाची अंमलबजावणी करून घेत आहे. त्यात यशही येत आहे. त्यानुसार पनवेलमधील ३४ आदेशांची वसुली करून तक्रारदारांना त्यांची रक्कम देण्यात आली आहे.

आणखी वाचा-देवनार पशुवधगृहातच म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध करणे बंधनकारक, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेलमधील लिलावाचे आधार मूल्य ३.७२ कोटी रूपये असताना लिलावात ४.८२ कोटी रूपयांची बोली लागली. ज्यामुळे या प्रकरणातील ३४ तक्रारदारांना नुकसानभरपाईची मुद्दल रक्कम अदा करण्यात आली. लिलावातून पैसे वसूल करून तक्रारदारांना नुकसानभरपाई देण्याची ही पहिलीच घटना आहे.